Wednesday 3 February 2016

स्वच्छतेविषयी म्हणी

स्वच्छतेविषयीची प्रत्येकी कृती, देई सामाजिक आरोग्याला गती.
·        घ्या महत्व स्वच्छतेचे ध्यानी व्हा निरोगी जीवनाचे धनी.
·        करुन परिसर स्वच्छता, करा रोगराईची सांगता.
·        लावून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, धरा निरोगी जीवनाची वाट.
·        सांडपाणी योग्य विल्हेवाट, करी रोगराईचा नायनाट.
·        उपयोगात आणू सांडपणी, परसबाग, फलवू आंगणी.
·        गांवकरी मिळून एक काम करु, शौचालयाचा वापर करु.
·        पाणी पुरवठा योजना गावाची, देखरेख जबाबदारी सर्वांची.
·        स्वच्छ घर, स्वच्छ आंगण, प्रसन्न ठेवू वातावरण.
·        होण्या सांडपाण्याचा योगय निचरा ते परसबाग फलविण्यासाठी वापरा,.
·        उघडया पदार्थांचा सेवन, रोगराईला ठरेल निमंत्रण.
·        अस्वच्छ हात, अस्वच्द दुषित अन्नपाणी, रोगराईची सुरु होतील रडगाणी.
·        कचरा कुंडीचा वापर करुन, संदर परिसर निर्माण करु.
·        करुन कचरा कुंडीचा वापर, निर्माण करु सुंदर परिसर.
·        जुलाब होता बालराजा, एस चे मित्रण पाजा.
·        पाणी गाळा, नारु टाळा.
·        स्वच्छ सुंदर परिसर, आरोगय नांदेल निरंतर.
·        परिसर हे स्वच्छ ठेवू, सुंदरतेचे गित गावू.
·        स्वच्छ निर्मल जीवन, सदा सुंदरतेचे वळण.
·        स्वच्छतेची आवड, सुंदरतेची निवड.
·        स्वच्छ शाळा करा हातांनी, संदुर गाणी गाऊ मुखांनी.
·        नष्ट करुया दलदल खड्डे, गड्डे खोदुनिया शोषखड्डे.
·        हिवतापाचे करु, वसाहतीतून देऊन शिक्षण.
·        परसबाग फलवावी परसदारी, आणण्या स्वास्थ घरोघरी.
·        एकच ध्यास मनी धरा, आरोग्य शिकण्याचा मंत्र खरा.
·        आस धरा कास धरा उचलून पेटीत टाकू कचरा.
·        चला चला त्वरा करा, सगळा परिसर स्वच्छ करा.
·        आरोग्याचा उपाय खरा, दातांची निगा हाच खरा ध्यास.
·        सारे मिळून करु साफसफाई दूर पळे रोगराई.
·        आहो संडास बांधण्यासाठी कधी म्हणू नये, रात्रीच्या अंधरात लोटा घेऊन जाऊ नये.
·        जो शौचालय आग्रह धीर तो कुटुंबाचे आरोग्य उध्दारी.
·        स्वच्छता ही माणसाचे आत्मदर्शन घडविते.
·        शौचालय असे जेथे, खरी प्रष्तिठा येईल तेथे.
·        आरोग्याचा मुलमंत्र, शोषखड्डयाचे सोपे तंत्र.
·        देह देवाचे देऊळ आत वाहे निर्मळ.
·        जेवणापूर्वी धुवा हात, जेवणानंतर धुवा हात.
·        देही आरोग्य नांदते, भाग्य नाही त्या परिते.
·        स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर.
·        स्वच्छ घर, सुंदर परिसर, शोषखड्डयाचा करुया वापर.
·        परसबाग ज्यांचे घरी, आरोग्य नांदी त्याची घरी.
·        नष्ट करुया दलदल खड्डे बांधुनिया शोषखड्डे.
·        संडास बांधा घरोघरी, आरोग्य नांदी त्यांचे दारी.
·        लांब ठेवा घरापासून गोठे, गुरांचे पाळा सर्व संदेश आरोग्याचे.
·        संडास बांधणे आरोग्यदायी आहे, कुटुंबाचे वैभव आहे.
·        कचरा कुंडी कंपोस्ट खड्डयाचा उपयोग करुन.
·        घरोघर शोषखड्डा परसबाग,गटशिक्षणाचा वापर करु माशा डास दलदल आणि रोगराईपासून बचाव करु.
·        सांडपाण्याची योग्य विल्हेवाट करा, आरोग्याचा हाच मंत्र खरा.
·        नको गावकयांचे पाण्यासाठी हाल करु या पाणी योजनेचे आपणच देखभाल.
·        हातपंप, टयुबवेल विहिरीचा परिसर ठेव 15 मीटरपर्यंत स्वच्छ सुंदर.
·        सुरक्षित साधन पाण्याचे महत्व पटवा हातपंपाचे.
·        गावकरी मिळून एक काम करु, पाणी योजनेची देखभाल.
·        पिण्याचे पाणी घ्या, ओगराळयाने, दुषित करुन नका आपल्या हाताने.
·        सांडपाण्याचा उपयोग करु, दारी आपल्या परसबाग लावू.
·        स्वच्छ घरसुंदर परिसर, आरोग्याचे माहेरघर.
·        सांडपाण्याचा योग्य निचरा, शोषखड्डयाचा अवलंब करा.
·        परसबाग लावा दारी, भाजीपाला मिळवा घरच्या घरी.
·        आपली आरोग्य उन्नती आहे आपल्याच हाती.
·        स्वच्छता शुध्द पाणी, तंत्र ग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र.
·        दूर करु सगळी घाण उडेल रोगाची दाणादाण.
·        सोनखत बहुमोल नका करु मातीचे मोल.
·        मलमुत्र नाही घाण शेतीचा तो पंचप्राण.
·        स्वच्छ गाव, सुंदर गांव, मंगल गाव, पवित्र गांव.
·        घरोघरी एकच नारा शौचालय त्वरीत करा.
·        सुंदर स्वच्छ परिसरातूनच सुंदर संस्कृत नागरिक घडतात.
·        स्वच्छ ठेवाल शाळा तर गावाची बरलेल कळा.
·        स्वच्छतेची मशाल घरोघरी पेटचा रोगराईला यमलोकी पाठवा.
·        वैयक्तिक स्वच्छता जेथे आरोग्य नांदेल तेथे.
·        सर्वजण घेवू हाती झाडे, गल्ली बोळातून कचरा काढू.
·        रस्त्यावर घाण करु नका, शौचालयाचा वापर करा.
·        शौचालय असेल जेथे घरी प्रतिष्ठा येईल तेथे.
·        नखे वाढली ज्याची भिती त्यांना रोगांची.
·        अन्न आणि पाणी याची विषयी दक्षता घेवू, सर्व रोगाराईंना दूर पळवू.
·        नाही लाज स्वच्छ करण्याची, नाही चिंता रोग होण्याची.
·        स्वच्छ राहू आपण सारे अमुल्य बनवू जीवन आपले.
·        स्वच्छ ठेवा शाळा गावाची बदलेल कळा.
·        स्वच्छतेचे नियम पाळा, घरी दारी प्रदुषण टाळा.
·        स्वच्छता ज्याचे घरी, आरोगय तेथे वास करी.
·        वैयक्तिक स्वच्छतेची महती रोगापासून मिळे मुक्ती.
·        बळबुध्दी सोन मिळवितो, स्वच्छतेचा जो धडा गिरवतो.
·        गुरुकिल्ली आरोग्याची कास धरा परिसर स्वच्छतेची.
·        वाया घालवू नका सांडपाणी, ताज्या भाज्या मिळवा परसबागेतूनी.
·        रोगराईचा करा नायनाट, मलमुत्राची लावू विल्हेवाट.
·        सांडपाण्याचा होई निचरा शेषखड्डयाचा वापर करा.
·        देता गैर समजूतींना थारा आजार होणार नाही बरा.
·        पाणी शुध्दीकरण नियमित करुन सर्वांची जीवन अरोग्य संपन्न करु.
·        मानवाचे वा जनावरांचे मलमुत्र शत्रु आरोग्याचे.
·        सोपे शौचालय बांधणे अतिशय सोपे आहे.
·        टाकऊतून टिकाऊ मलमुत्राची फायदा घेवू.
·        नाही उघडयावर जाण्याचा त्रास रावांनी मायासाठी बांधला संडास.


No comments:

Post a Comment