Sunday 5 June 2016

जिल्हयात महास्वच्छता मोहिम, 76 हजार स्वच्छतादूतांचा सहभाग z p nashik sbm

नाशिक जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्ताने जिल्हयात महास्वछता मोहिम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत जिल्हयातील सर्व कार्यालयांमंधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. या मोहिमेत तब्बल 76 हजार स्वच्छतादूतांनी सहभाग घेवून तब्बल 700 मे. टन कच-यांची संकलन करण्यात आले. या मोहिमेमुळे जिल्हयात मोठया प्रमाणात स्वच्छतेविषयक जनजागृती निर्माण झाली असून स्वच्छ भारत अभियानास गती मिळणार आहे.

या मोहिमेत स्वत: जिल्हाधिकारीराधाकृष्ण्ण व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त प्रविण गेडाम आदि अधिकारी सामिल झाले. जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, तालुकास्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी, पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले. ग्रामीण स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर व पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांनी या मोहिमेचे सनियंत्रन केले. या मोहिमेत जिल्हा परिषदेच्या सुमारे १० हजारांपेक्षा जास्त स्वच्छतादूतांनी सहभाग घेतला. दरम्यान, जिल्हा परिषदेने नियोजनबध्दपणे राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी  कौतूक केले. याच मोहिमेंतर्गत ३ जून रोजी जिल्हयातील सर्व कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली.






No comments:

Post a Comment