Thursday 8 September 2016

स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी – मा. श्री. राजेशकुमार







नाशिक - चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता हा महत्वाचा घटक असून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचविण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या गृहभेट अभियानास राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून घरोघरी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा गाव हागणदारीमुक्त करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव श्री. राजेश कुमार यांनी केले.
नाशिक तालुक्यातील आंबेबहुला येथे आयोजित गृहभेट कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शौचालय ही आज अत्यावश्यक गरज निर्माण झाली आहे. मात्र केवळ शौचालय बांधल्यावर अनुदान मिळते म्हणून शौचालय बांधता आपल्या आत्मसन्मानासाठी शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्त करण्याचे आवाहनही त्यांनी शेवटी केले. ग्रामस्थांनी 2 ऑक्टोबर पर्यंत गाव हागणदारीमुक्त करण्याचा निश्चय त्यांच्या उपस्थितीमध्ये केला यावेळी श्री. राजेशकुमार यांनी स्वत: गृहभेटी करुन ग्रामस्थांशी सवांद साधला गाव हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले. त्यांचे हस्ते शौचालय असलेल्या शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरांवर स्वच्छता विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेले स्टिकर्स चिटकवण्यात आले. तसेच शौचालय बांधकामाचा शुभारंभही करण्यात आला. इगतपूरी तालुक्यातील गोंदे येथील पाणी शुध्दीकरण प्रकल्पाची पाहणीही श्री. राजेश कुमार यांनी केले. , त्यांच्यासोबत जलस्वराज्य प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री दिलीप देशमुख, पाणी स्वच्छता संस्थेचे संचालक डॉ. सतीश उमरीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे, वासोचे कुमार खेडकर, चंद्रकांत कचरे, नितीन व्हटकर गटविकास अधिकारी श्री. कोल्हे, सहायक गटविकास अधिकारी श्रीमती. गुजराथी यांच्यासह, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा तालुका कक्षातील सल्लागार आदि उपस्थित होते.
मुख्यमंत्रयांनी केले स्वच्छता स्टॉलचे कौतूक

दरम्यान, मा. मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत आरोग्य विज्ञान विदयापिठात आयोजित विभागस्तरीय आढावा बैठकीप्रसंगी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेविषयक माहिती देणारा स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला धावती भेट देत मुख्यमंत्री महोदयांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत चांगले काम होत असल्याबाबत जिल्हा कक्षातील कर्मचा-यांचे कौतूक केले

No comments:

Post a Comment