Tuesday 23 February 2016

मन करारे प्रसन्न ! सर्व सिद्धीचे कारण “

मन करारे प्रसन्न !
सर्व सिद्धीचे कारण “
मन हा सर्वात सुंदर गोष्टींचा सुंदर शिल्पकार असतो .निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. आपले शरीर एक सुंदर देवालय आहे आणि देवालयात मनरूपी देव वास करत असतो. मन जर सात्विक असेल ,सात्विक विचाराने परिपूर्ण असेल तर आपल्या हातून नवनिर्मितीचे कार्य घडते व या कार्याने आसमंताच्या चारी दिशा उजव्वून जातील यासाठी निरोगी मन असणे महत्वाचे आहे .निरोगी मन हे निरोगी शरीरात असते .शरीर निरोगी राहण्यासाठी स्वच्छतेचा फार मोठा वाटा असतो .
ज्ञानदेव पाया रचिला ,
तुका झालासे कळस !!
समाज जागृतीचा ,समाज परिवर्तनाचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला , नामदेवांनी ह्याच्या भिंती बांधल्या ,एकनाथांनी त्यावर घुमट चढवला आणि त्यावरती कळस तुकोबारायांनी चढविला अशा या सामाजपरीवर्तनाच्या कळसावर पताका लावण्याचा कार्य संत गाडगेबाबांनी केले.
सुंदर ते ध्यान कीर्तनी शोभले !
करी धरीयेले गाडगे ,काठी !
डोई शुभ्र केस उडती वारयाने!
चिंध्या प्रकाशाने चमकती !
स्वतः निरक्षर असणाऱ्या या महामानवाने स्वच्छतेचे महत्व समजले .स्वतःचे सर्व आयुष्य त्यासाठी समर्पित केले .आपल्या अभूतपूर्व कर्तुत्वाने ‘स्वच्छतेचा ‘ वसा या राष्ट्रासंताने भारताला ज्ञात करून दिला .’जीवनात स्वछता श्रेष्ठ आहे ‘ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबांनी स्वतःच्या आचरणातून पटवून दिले .त्यांच्या उपदेशातूनच स्वच्छतेचा मंत्र मिळाला .
‘भारत माझा देश आहे .सारे भारतीय माझे बांधव आहेत .समृद्धीतेने  व विविधतेने नटलेल्या भारताचा मला अभिमान आहे ‘ हि प्रतिज्ञा म्हणताना आपल्याला आपल्या देशाविषयी अभिमान असण्याबरोबरच देशासाठी आपण स्वतःला करावयाची कर्तव्याविषयी जागरूकता असणे गरजेचे आहे . विविध नैसर्गिक सौदेर्याने नटलेल्या या देशात सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे  असंख्य बाबीमुळे कचऱ्याचे प्रमाण अस्वच्छतेचे प्रमाण वाढतच आहे .अशा गलिच्छ वातावरणात राहण्यामुळे आपली शारीरिक क्षमता कमी होतेच पण मानसिक आजार देखील होऊ शकतात .
हिरवे हिरवे गालिचे !
हरिततृणांच्यामखमालीचे !
त्या मखमाली वरती ,
फुलराणी ती खेळत होती !
हि कविता ऐकली कि आपल्या डोळ्यासमोर जणू स्वर्गच उभा राहतो .पण याचे स्वप्न न पाहता स्वर्ग प्रत्यक्षात निर्माण करू शकतो . आज आपण विचार केला तर आपापल्या खाण्यापिण्यासाठी जेवढा खर्च होतो त्याच्या हि पेक्षा अधिक खर्च रोगराईसाठी होतो . हि परिस्थिती बदलण्यासाठी आरोग्याचा गुरुमंत्र सर्वांनी स्वीकारायला हवा .
स्वच्छतेचा घेऊन ध्यास
मनात फुलांची फुलवली आस
परसदारी फुलवली सुंदर बाग .
हि सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मला असे वाटते कि स्वच्छतेचा पाठ हा स्वतःपासून गिरवावा . मला वाटते याचा प्रारंभ वैयक्तिक स्वच्छतेपासून करावा .मी स्वतःला स्वच्छ राखण्यासाठी अनेक गोष्टी करू शकते आणि करण्यास प्रारंभ केला आहे . उदाहरणार्थ – नियमित अंघोळ करणे ,दात घासणे ,दात, डोळे, कान यांचे आरोग्य राखणे , केस व नखे योग्य वेळी कापणे .मी वैयक्तिक स्वच्छता राखू शकेल तरच आजूबाजूची परिसर स्वच्छता करण्यास पात्र ठरेन नाहीतर ‘दुसरया शिकवे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण ‘ अशी आवस्था होईल .वैयक्तिक स्वच्छतेबरोबेरच परिसर स्वच्छताही महत्वाची आहे .आपण ज्या घरात राहतो ते स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो उदाहरनार्थ आई हि सतत कामात व्यस्त असते. तिच्या कामात मदत करू शकते तिच्याकडून कचरा कुठेतरी टाकला जाण्यापेक्षा कचऱ्याचा डबा आणून त्यात एकत्र करून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे. ओला कचरा सुखा कचरा वेगळा करून ठेवणे. इ बाबी घर स्वच्छ करण्यासाठी तसेच नियमित घरातील कचरा काढणे .सर्व वस्तू जागेवर ठेवणे इत्यादी . वडील स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असतात .संडास ,बाथरूम ,बेसिन याची स्वच्छता घराबाहेरील परिसर स्वच्छता याचबरोबर शेजारी असणारी मोकळी जागा रस्ता या जागेतील स्वच्छता ते स्वतः करतात .मला त्याचा अभिमान वाटतो .जे त्यांना वाटते तेच मलाही वाटते .स्वच्छतेमुळे रोगराई दूर पडते .आता आजूबाजूच्या परिसर स्वच्छतेत मर्यादित राहण्यापेक्षा आपण गाव स्वच्छतेकडेही वळले पाहिजे .
ईश्वर व्यापिले हे विश्व
म्हणोनी जगाची आम्हा देव
विश्वाचा मुळ घटक गाव!
ग्रामगीता त्यासाठी
यात ग्रामाचा जयजयकार
सर्व तीर्थांचे ग्रामची माहेर .
ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर
ग्रम नसता प्रलयची!!
हे लक्षात घेऊन स्वच्छतेचा मूलमंत्र आळवायचा आहे .”माझ गाव स्वच्छ असेल तर माझा देश स्वच्छ होईल “हि भावना मनात रुजवायची आहे. आपला देश खेड्यांचा ,गावांचा देश आहे . जोपर्यंत खेडे स्वच्छ व सुंदर व निर्मेल होणार नाहीत तोपर्यंत भारत स्वच्छ व सुंदर बनू शकणार नाही . स्वच्छतेच्या पायरीवर खंबीरपणे उभे राहून आरोग्याची कास धरूनच विकासाची समृद्धीची फळे चाखता येणार आहेत . मी अशी प्रतिज्ञा करते कि-  माझ्या घराच्या ,सभोवतालच्या स्वच्छ परीसराबरोबरच ,शाळेतील किंवा सार्वजनिक ठिकाणी जाईन त्या ठिकाणी माझ्याकडून कोणत्याही प्रकारे अस्वच्छता निर्माण होणार नाही याची मी स्वतः काळजी घेईन. तसेच माझ्या मैत्रिणीला हि याबाबत तसेच नातेवाईकांना सहयोगी करून घेईल . माझ्या देशातील प्रत्येक परिसर माझाच आहे .मला त्या परिसरात अस्वच्छता पसरू दयावयाची नाही हेच माझे कर्तव्य राहील आणि मी सतत प्रयत्नशील राहीन. राष्ट्रसंताचे विचार जगवण्यासाठी
“स्वच्छतेचे देशविकासाचे स्वप्न पाहून !
नित्याची धडपड ठेऊन !!
संताचे विचार घेऊन !

देशाला ,राष्ट्राला बनवू महान”!!

No comments:

Post a Comment