Tuesday 23 February 2016

गाव चांगले असेल तरच देशाचे भविष्यही चांगले.....

संत तुकडोजी महाराजांनी रचिलेल्या ग्रामगीतेतील पहिल्याच अध्यायातीलही ५० वी ओवी. गाव चांगले असेल तरच देशाचे भविष्यही चांगले होते,  असा त्यांचा संदेश. गावच्या विकासा साठी संतानी आपापल्या परिने प्रयत्न केले.त्यातील च संतगाडगेबाबा व तुकडोजी महाराजांचे योगदान महत्वाचे मानले जाते .देव – देवतांच्या पूजेबरोबरच श्रमातून भक्ती करा.गाव चांगले ठेवा .त्यामुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल, ही शिकवण त्यांनी युवकांना देण्याचा प्रयत्न केला. सदयस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागात अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभावणाऱ्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे ज्यांचे आरोग्य मान, पर्यायाने जीवन स्तर उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील आहे . (उदा. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,  निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना वगैरे) यामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय व सातत्यापूर्ण उत्स्फुर्त सहभाग कार्यक्रमात करुन घेण्याची प्रभावी तरतूद कार्यक्रम अंलमबाजवणी करण्यासाठी शासन ही प्रयत्नशील आहे.

घरांची,  गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता न्हावी व सर्वसामान्य जनतेचे आरोग्य मानव पर्यार्याने जीवनमान उंचवावे व त्यायोगे  ``स्वच्छतेतून समृध्दीकडे'' हे संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे.  तसेच पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृद्ध व संपन्न परिसर, गाव व पर्यायाने देशाची निर्मिती करणेही काळाची गरज असल्याने जल, जमीन,  जंगल, हवा, वनस्पती इ. चे योग्य व्यवस्थापन करुन भौतिक सोयी -  सुविधांची निर्मिती  ``पर्यावरण संतुलन''  ठेऊन केल्यास नागरीकांचे जीवनमान,  दर्जा सुधारण्यास मदत होईल, त्यासाठी स्वच्छतेची सवय प्रत्येकांमध्ये खोलवर रुजण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण विदेशातील शहरांची स्वच्छता पाहुन त्यांचे गुणगान गातो,  मात्र तेथील स्वछता, शिस्त,  सौंदर्य,  सृष्टी व हिरवळ वाखाणण्याजोगी आहे,  ती केवळ तेथे राहणाऱ्या लोकांमुळेच. त्यांच्या स्वच्छतेच्या सवयीमुळेच आहे, हे मात्र आपण विसरतो.  आपण आपल्या मनाला,  शरीराला, घराला, परिसराला स्वच्छ बनविण्यासाठी पाऊल उचलण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात येऊन आपला घामाचा पैसा व वेळ वाया जात आहे. आज सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये,  लोकल,  ऑफिस,  उदयान,  इमारती,  रस्त्यांवर,  गल्ली बोळांत, आपल्याला अस्वच्छता दिसते. कुठेही थुंकणे,  पान खाऊन पिचकारणे,  सिगारेट ची थोटके,  खाद्य पदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे,  तंबाखू,  गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्या नदया या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी बनल्या आहेत. कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.  किती जाण आपल्या मुलांना स्वच्छते चे महत्व सांगातात ?त्याचे अनुकरण करायला सांगतात ? आणि स्वत:  ही त्याचे अनुकरण करतात ?
आपल्या कडे अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होतात. त्यामुळे घराची व परिसराची स्वच्छता हे उत्तम आरोग्या चे महत्वाचे अंग आहे.
आपले मन स्वच्छ,  तर आपले घर स्वच्छ।
आपले घर स्वच्छ, तर आपला परिसर स्वच्छ।।
या उक्ती प्रमाणे स्वच्छता राखण्याची जबाबदारीही स्वत: पासून सुरु करावी लागेल. त्याच प्रमाणे मी स्वत: ही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आठवडयातून किमान १ तास स्वच्छता करण्याचा संकल्प करुन तसा प्रयत्नही सुरु केलेला आहे. त्याचप्रमाणे मी स्वत: ही घाण करणार नाही व दुसऱ्यालाही घाण करुन देण्याचा प्रयत्नकरीन.  सर्व प्रथम मी स्वत: पासून,  माझ्या कुटूंबा पासून, माझ्या गल्ली / वस्तीपासून, माझ्या गावा पासून ते कार्यस्थळा पर्यंत या कामास सुरुवात केलेली आहे व पुढे ही करेन. त्याच बरोबर माझे सम विचारी, सहकारी यांच्या तही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देवून त्यांनाही या कामात सक्रीय सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. मला माहित आहे की,  मी व माझ्या प्रमाणेच, असंख्य व्यक्तींनी स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल.
गाव ही शरीर।त्यास राखावे नेहमी पवित्र।
त्याने च नांदेल सर्वत्र।आनंदी गावी।।
रामधून पूर्वी गावपूर्ण।व्हावे स्वच्छ,  सौंदर्यवान।
कोणाही घरी गलिच्छपणा।न दिसावे।।
स्वत: प्रमाणेच, सभोवतालीचे परिसरही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बानावयास हवी.
Cleanliness is next to Godliness - म. गांधी या घोष वाक्यास अनुसरुन मा.पंतप्रधान यांनी नेमके आपल्या मर्मावर बोट ठेवून स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आहे. आपले सर्वांचेच हे कर्तव्य ठरते की, आपण केवळ वैयक्तिक स्वच्छतेवर च भर न देता सामुदायिक पातळीवर एकत्र येवून काम केल्यास आपले शारीरिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्य टिकण्यास व वृध्दींगत होण्यास मदत होईल. यामुळे आपण केवळ वैयक्तिक स्वार्थ साधत नाहीतर, ती एक मोठी देश सेवा व निसर्ग सेवाही आहे.
पहिले पाऊल घरचा धंदा।दुसरे पाऊल दारच्या प्रबंधा।।
पुढे ग्राम सफाईच्या छंदा।लावोनि घ्यावे आनंदे।।
सार्वजनिक स्वच्छते मध्ये येणाऱ्या गोष्टी :-
१) पाणी व्यवस्थापन :- ग्रा.पा.पु., स्वच्छता समिती व ग्राम सभेमार्फत जल अंदाज पत्रक व त्याची अंमलबजावणी, टि. सी.एल.पावडर / हायपोचा नियमित वापर, शुध्द व स्वच्छ पाणी पुरवठा, पाणी गळती थांबविणे.
२) सांडपाणी व्यवस्थापन :- शोषखड्डे, बंदिस्तगटारे, परसबाग, शेतीउदयोग इ. द्वारे शास्त्र शुध्द विल्हेवाट व पूर्नवापर करणे.
३) शौचालय / मुतारीव्यवस्थापन :- विविध उत्सवातील विसर्जन करुन पर्यावरण दृष्टया अंमलबजावणी करणे,  सार्वजनिक ठिकाणी पुरेशी शौचालये व मुतारींची व्यवस्था व वापर तसेच, हात धुण्यासाठीची व्यवस्था व पुरेसे पाणी  (उदा. शाळा, कॉलेजेस, बसस्थानके, भाजीमार्केटवगैरे) सार्वजनिक शौचालयांमधील मैल्याची विल्हेवाट करुन बायोगॅस,  सोन खतनिर्मितीही करता येवू शकते.
४)घन कचरा व्यवस्थापन :- कचरापेटयांची पुरेशी संख्या,  ओला, सुका व प्लॅस्टिक कचरायांचे वेळोवेळी वर्गीकरण व विल्हेवाट,  कचरा उचलून नेण्याची सातत्यपूर्ण व स्वतंत्र व्यवस्था, ओल्या कचऱ्याचे नॅडेप/ गांडूळखत/कंपोस्टखत इ.  मार्गाने खतात रुपांतर व पूनर्वापर तसेच दवाखाने, रुग्णालये येथील घातक ठरणाऱ्या कचऱ्याची शास्त्र शुध्द पध्दतीने विल्हेवाट लावून आर्थिक उत्पन्नही मिळविता येवू शकते.
५)अपारंपारिक उर्जेचा वापर  :- स्ट्रीट लाईट,  सोलर यांचा वैयक्तिक व सार्वजनिक वापर करणे, प्लॅस्टिकबंदी (५०मायक्रॉन) ची अंमलबजावणी करणे.
६) पर्यावरण सवंर्धन :- वृक्षलागवड, जतन,  संवर्धन, टॅगिंग करणे व वृक्ष लागवडीची नोंद ठेवणे.
७)घर / गांव / परिसर स्वच्छता :- गावातीलरस्ते, गल्ल्या, घरासमोरीलअंगणे, परसबागा, स्वच्छता, सजावट व वृक्ष संवर्धन तसेच,  अन्न धान्य साठवणुक पिण्याच्या पाण्याची व वापराची शास्त्र शुध्द व्यवस्था,  स्वच्छता नीटनेटकेपणा इत्यादी.
आपण नेहमी पैसा – वस्तू अशा गोष्टी दान करतो. आज आपला देश आपल्याला आपल्या श्रमाचे दान मागतो आहे. नागरीकांच्या सहकार्याने चे हे शक्य होऊ शकते. तेव्हा या अभियानांतर्गत म्हणा किंवा स्वयं प्रेरणेने म्हणा, आपला सभोवतालील परिसर जरुर स्वच्छ करा.पण,  मुळात आपणच अस्वच्छता करण्यासकारणीभूत ठरत तर नाहीना ?याचा विचार करुन आधी   अशा प्रकारचा कचरा / अस्वच्छतेला पायबंद घाला.सुधारणा च करायची असेल तर दुसऱ्याकडे बोट न दाखविता आणि यंत्रणांना दोष न देता स्वत:  पासून च सुरुवात करा.  तरच, आपला देश स्वच्छ आणि सुंदर होऊ शकेल.
गाव व्हावया निरोगी सुंदर। सुधारावे लागेल एकेक घर।
आणि त्यातून हि घरात राहणार।करावा लागेल आदर्श।।

चला तर, आपण स्वत: आपला परिसर, आपला भारत स्वच्छ राखूया.

No comments:

Post a Comment