Thursday 30 June 2016

समुदाय संचलित हागणदारीमुक्त कृती आराखडा करुन गाव हागणदारीमुक्त करावे – मिलिंद शंभरकर

समुदाय संचलित हागणदारीमुक्त कृती आराखडा (ODEP) ही अतिशय परिणामकारक कृती असून या माध्यमातून गाव हागणदारीमुक्त करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी मिलिंद शंभरकर यांनी केले. नाशिक जिल्हयातील कळवण तालुक्यातील देसगाव (बाडीपाडा) येथे आयोजित समुदाय संचलित हागणदारीमुक्त कृती आराखडा प्रक्रियेप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर बोलत होते. याप्रसंगी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे कळवण पं.स.चे गटविकास अधिकारी श्री. टी.टी. सोनवणे, सरपंच, उपसरपंच, ग्रापं. सदस्ये, ग्रामसेवक तसेच जिल्हा व तालुका कक्षातील सल्लागार उपस्थित होते. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. नाशिक जिल्हयात सन २०१६-१७ मध्ये निवडलेल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येत असून यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.









No comments:

Post a Comment