Tuesday 23 February 2016

‘केल्याने होत आहे| आधी केलेचि पाहिजे’

‘केल्याने होत आहे|
आधी केलेचि पाहिजे’
संत रामदास यांच्या काव्यकल्पनेनुसार दुसऱ्यांना सांगण्यापूर्वी एखादे काम आपण केले पाहिजे. आधी केले मग सांगितले असे होईल. शारीरिक श्रम न केल्यास नाना व्याधी आपल्या जीवनात उभ्या राहतात. म्हणून बुध्दीजीवी कामे करणाऱ्यांनी दररोज काही वेळ तरी शारीरिक श्रमाची किंवा मेहनतीची कामे केळी पाहिजेत.
शरीर सुदृढ असेल तर आपण कष्टाची कामे सहज करू शकतो. कष्टाची कामे करण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःच्या दैनंदिन कामांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वतःच्या स्वच्छतेकडे लक्ष देते. सकाळी उठल्यानंतर दात घासणे, अंघोळ करणे, केस नीट विंचरणे, पावडर लावणे, छान असा पोशाख करणे, पोशाखाला शोभेल अशी चप्पल घालणे, मगच बाहेर पडणे. हि झाली बाह्य स्वच्छता. शरीरावर दागिने घालून बाह्य शरीर सुंदर बनवितो. पण
नाही निर्मळ जीवन|
काय करील साबण|
संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार शरीरावर दागिने घालून शरीर सुंदर बनवितो साबणाने शरीर (बाह्य) स्वच्छ करतो, परंतु मनामधील वाईट विचार, खोटे बोलण्याची सवय असेल, इतरांना फसविणे, दुसऱ्यांना लुबाडणे, खोटे सांगणे, टिंगल-टवाळी करणे इ. सवयी नाहीशा करण्यासाठी साबणाचा उपयोग होणार नाही. तर मनातील विचार सुंदर व स्वच्छ बनविणे आवश्यक आहे.
थोर नेत्यांची थोर विचारांची पुस्तके वाचून माझे मन स्वच्छ बनविण्याचा प्रयत्न केला. आता माझे शरीर व मन अंतर्बाह्य खऱ्या अर्थाने स्वच्छ झाले. स्वतःची स्वच्छता झाली म्हणजे सर्वकाही स्वच्छ झाले असे नाही. तर माझे कुटुंब, गाव, समाज, राज्य, राष्ट्र या सर्वच ठिकाणी स्वच्छता करायची आहे. सर्व ठिकाणे स्वच्छ करणे शक्य नाही. पण कुटुंब, गाव व आजूबाजूचा परिसर मी निश्चित स्वच्छ करू शकते. मी माझी स्वच्छता जशी केळी त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वच्छ कशी बनेल? याचा विचार केला. घरातील सर्व समान व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. प्रत्येकाने मला या कामात मदत केळी. माझ्या कुटुंबाची स्वच्छता झाली आता आजूबाजूच्या परिसर (गाव, शेजारी) स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. आजूबाजूच्या परिसरातील, शाळा, रस्ते, भाजीमंडई, सार्वजनिक ठिकाणे(देवालये, चित्रपटगृह, दवाखाने) इ. असंख्य गोष्टी आहेत.
मी वरील काही घटक घेऊन पुढीलप्रमाणे प्रयोग करायला सुरुवात केळी. सर्व प्रथम मी शाळा घटक निवडला. जिथे विद्यार्थ्यांना घडवले जाते, ज्ञान दिले जाते तेच स्वच्छतेचे महत्त्वाचे द्योतक आहे. परिसर का स्वच्छ ठेवायचा? कसा स्वच्छ ठेवायचा? हे सर्व त्या विद्यार्थांना सांगितले. आजूबाजूच्या कचऱ्यामुळे रोगराई पसरते. ती कशी दूर केळी जाईल हे समजावून सांगितले. ह्या सर्व गोष्टी विद्यार्थांना समजल्या. कुठेही कागद किंवा अन्य कोणतीही टाकाऊ वस्तू टाकायची नाही. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पेन्सिलला टोक काढलीतरी वर्गात कचरा टाकत नाही. त्यासाठी वेगळी सोय करतात. दप्तर वेळच्यावेळी धुणे, दप्तर स्वच्छ ठेवणे हे सर्व विचार विद्यार्थ्यांना समजले आणि काय? विद्यार्थीच शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ करू लागतील! शाळेच्या शिपायांना स्वच्छतेचे कामच उरणार नाही. शाळेचा परिसर स्वच्छ झाला व आजूबाजूचा परिसर व्यक्ती स्वच्छ होणे आवश्यक आहे. ज्याठिकाणी दोन किंवा तीन दिवसांनी एक तास पाणी येते. त्या लोकांना पाण्याचा काटकसरीने वापर कसा करायचा हे सांगितले. ‘ पाणी अडवा, पाणी जिरवा ’, हि मोहीम आखली आणि पाण्याचा साठ केलं. अर्थात स्वच्छतेला पाण्याची गरज आहे हे समजले. सर्वांनी स्वतःला व आजूबाजूला परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली.
शाळेच्या समोरच रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूना दुकाने आहेत. काय मजा बघा. दोन्ही बाजूचे दुकानदार आपल्या दुकानाच्या समोरील जागा झाडूने झाडून कचरा रस्त्याच्या मध्यभागी आणून गोळा करतात. याला कारण काय असेल? रस्ता सरकारने बनविला आहे. त्यावर कचरा टाकला तरी कुणीही विचारणार नाही. अशा या दुकानदारांना एकत्र केले त्यांना विचारले,” तुम्ही हा कचरा रस्त्यांच्या मध्यभागी आणून का गोळा करता. कचरा कचरा पेटीत का टाकत नाही. एकाने उत्तर दिले, कचरा गोळा करण्यासठी महानगरपालिकेचे सफाई कामगार येत्तात. टे उचलतील!
दुसरा म्हणाला, ‘ मी रोज रस्त्यावरचा कचरा का भरू? रस्ता माझा काही एकट्याचा नाही. तो आपल्या सर्वांचा आहे. मी त्यांना असे सांगू इच्छिते, “ अहो आपल्या दुकानातील प्रत्येक वस्तू तुम्ही स्वतःची आहे असे म्हणता. प्रत्येक वस्तू तुमची आहे म्हणून तिची काळजी घेत्ता, स्वच्छ ठेवता, कुणालाही हात लावू देत नाही. त्या वस्तू व्यवस्थित जपून ठेवता. वस्तू मात्र तुमच्या आहेत. रस्ता तुमचा नाही. जर प्रत्येकाने हा रस्ता माझा आहे. तो माझ्यासाठी आहे. असे म्हटले तर रस्त्यावर कचरा साठणारच नाही. जेवढी आपण दुकानातील वस्तूंची काळजी घेतो तेवढी रस्त्याची काळजी घेतली, रस्ता स्वच्छ ठेवला तर रस्ता सुद्धा माझा होईल ना! तो स्वच्छ ठेवायची जबाबदारी माझी राहील. खरंच हा उपक्रम राबविला तर रस्त्याची स्वच्छता निश्चितच होईल.
पुढील उपक्रम आहे भाजीमंडईतीळ कचरा. अरे बापरे! भाज्यांच्या कचऱ्याचा ढिगारा बाजूलाच पडला होता. बरेच दिवस झाले कचरा उचलला नव्हता. शेवटी भाजी सर्व विक्रेत्यांना एकत्र करून त्यांना सांगितले, भाज्यांची पाने, त्यांची मुळे, ओल्या भाज्या, सुक्या भाज्या अशी वेगवेगळी वर्गवारी करावी. रोज एका किंवा दोन व्यक्तींनीवरील कचऱ्याचे डबे उचलून कचराकुंडीत कचरा टाकावा. महानगर पालिकेच्या व्यक्ती येईपर्यंत थांबायचे नाही. अशाप्रकारे काम करू लागले तर कचऱ्याचा ढीग राहणारच नाही. तेथील कचऱ्याचा वास नाहीसा होईल. स्वच्छता राखली जाईल. भाजीमंडईतील कचरा ‘कचराकुंडीत’ जाऊ लागल्यामुळे गावकुसाबाहेर दुर्गंधी पसरू लागली. रोग्रयीचे प्रमाण वाढले. महानगरपालिकेच्या व्यक्तींना सुका कचरा व ओला कचरा अशा दोन कचरापेट्या तयार करायला सांगितल्या. प्रत्येक कचरा टाकणाऱ्या व्यक्तींनी वरीलप्रमाणेच कचरा टाकायचा आहे हे सांगितले. प्रत्येक व्यक्तीला घरामध्ये दोन डबे करण्यास सांगितले. त्यामुळे कचरा इतरत्र भर टाकण्यासाठी मिळतो. ओल्या कचर्यापासून खत बनविले जाते. या सेंद्रिय खताचा उपयोग शेतीसाठी केला जातो. त्यामुळे दुर्गधी नाहीशी झाली.
पण दुसरे संकट मी त्या भाजी विक्रेत्यांजवळ ठेवले. कोणते बरे! जो कापडी पिशवी घेऊन येईल किंवा भाजी हातातून घेऊन जैन त्यालाच भाजी विकत द्यायची. भाजीची विक्री नाही झाली तरी चालेल. सर्व भाजी विक्रेत्यांनी असे केले तर नक्कीच प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी येईल व आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील.

याशिवाय चित्रपटगृह, हॉस्पिटल इ. ठिकाणी विविध उपक्रम योजून स्वच्छता राबविता येईल.'

No comments:

Post a Comment