Thursday, 30 June 2016

समुदाय संचलित हागणदारीमुक्त कृती आराखडा करुन गाव हागणदारीमुक्त करावे – मिलिंद शंभरकर

समुदाय संचलित हागणदारीमुक्त कृती आराखडा (ODEP) ही अतिशय परिणामकारक कृती असून या माध्यमातून गाव हागणदारीमुक्त करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी मिलिंद शंभरकर यांनी केले. नाशिक जिल्हयातील कळवण तालुक्यातील देसगाव (बाडीपाडा) येथे आयोजित समुदाय संचलित हागणदारीमुक्त कृती आराखडा प्रक्रियेप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर बोलत होते. याप्रसंगी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे कळवण पं.स.चे गटविकास अधिकारी श्री. टी.टी. सोनवणे, सरपंच, उपसरपंच, ग्रापं. सदस्ये, ग्रामसेवक तसेच जिल्हा व तालुका कक्षातील सल्लागार उपस्थित होते. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. नाशिक जिल्हयात सन २०१६-१७ मध्ये निवडलेल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येत असून यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.









Sunday, 5 June 2016

जिल्हयात महास्वच्छता मोहिम, 76 हजार स्वच्छतादूतांचा सहभाग z p nashik sbm

नाशिक जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्ताने जिल्हयात महास्वछता मोहिम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत जिल्हयातील सर्व कार्यालयांमंधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. या मोहिमेत तब्बल 76 हजार स्वच्छतादूतांनी सहभाग घेवून तब्बल 700 मे. टन कच-यांची संकलन करण्यात आले. या मोहिमेमुळे जिल्हयात मोठया प्रमाणात स्वच्छतेविषयक जनजागृती निर्माण झाली असून स्वच्छ भारत अभियानास गती मिळणार आहे.

या मोहिमेत स्वत: जिल्हाधिकारीराधाकृष्ण्ण व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त प्रविण गेडाम आदि अधिकारी सामिल झाले. जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, तालुकास्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी, पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले. ग्रामीण स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर व पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांनी या मोहिमेचे सनियंत्रन केले. या मोहिमेत जिल्हा परिषदेच्या सुमारे १० हजारांपेक्षा जास्त स्वच्छतादूतांनी सहभाग घेतला. दरम्यान, जिल्हा परिषदेने नियोजनबध्दपणे राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी  कौतूक केले. याच मोहिमेंतर्गत ३ जून रोजी जिल्हयातील सर्व कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली.






Friday, 3 June 2016

जिल्हयात ५ जुन रोजी महास्वच्छता अभियान

५ जुन पर्यावरणदिनी नाशिक जिल्हयात महास्वच्छता अभियाना राबविण्यात येत असून यामध्ये जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. या मोहिमेंतर्गत जिल्हयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग श्रमदान करणार असून स्वच्छतेविषयक, प्लॉस्टिक विषयक, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदिंविंषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हयाचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह जिल्हयातील सर्व विभागांचे अधिकारी व पदाधिकारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

      जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे हे ग्रामीण भागातील स्वच्छता मोहिमेचे संनियंत्रण करित असून जिल्हयातील ग्रामीण भागात यशस्वीपणे ही मोहिम राबविण्यात येणार आहे.



Friday, 20 May 2016

राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व युनिसेफ यांच्यावतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत लोणावळा येथे राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व.स्व्) यांची दोनदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत शौचालय बांधकाम व हागणदारीमुक्त गाव यात चांगली कामगिरी केल्याबददल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिलिंद शंभरकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांना सन्मानपत्र देवून सत्कार करताना राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव मा. राजेश कुमार सर. सोबत पाणी व स्वच्छता सहाय्य्‍ संस्थेचे संचालक मा. सवई सर.


Wednesday, 18 May 2016

समुदाय संचलित हगणदारीमुक्त कृती आराखडा- नियोजन प्रकियाबाबत उजळणी प्रशिक्षण



समुदाय संचलित हगणदारीमुक्त कृती आराखडा- नियोजन प्रकियाबाबत उजळणी प्रशिक्षण

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन नाशिक अतंर्गत स्वच्छ भारत अभियान समुदाय संचलित हगणदारीमुक्त कृती आराखडा- नियोजन प्रकियाबाबत उजळणी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी मा. मु.का.अ श्री. मिलिंद शंभरकर, मा. उपमुकाअ श्रीमती. प्रतिभा संगमनेरे तसेच प्रशिक्षणात मार्गदर्शन करणारे श्री. चंद्रकांत कचरे, राज्य अधिकारी हे उपस्थित होते.